पुणे : कसब्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त साबण, उटणे वाटप करण्यात आल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. त्यानंतर रविवारी रात्री उशीरा धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा >>> नाराजांची समजूत काढण्याचे शंकर जगताप यांच्यासमोर आव्हान; अश्विनी जगताप यांच्याऐवजी शंकर जगताप यांना भाजपची उमेदवारी

याबाबत निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हिंदमाता प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त कसबा मतदारसंघातील नागरिकांनी दिवाळीनिमित्त सुगंधी, उटणे, उदबत्ती, रांगोळी अशा वस्तू असलेल्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पिशवीवर धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नीचे छायाचित्रे असून, मतदारांना प्रलोभन दाखविण्यात आल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. त्यानंतर रविवारी रात्री निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा >>> मावळ विधानसभा: “भाजपने आमच्यात लुडबुड करू नये…”, आमदार सुनील शेळकेंनी भाजपला सुनावले

दरवर्षी माझा मित्र परिवारआनंदाची दिवाळी भेट देतो. नागरिकांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. आचारसंहिता लागू केल्यानंतर कुठल्याही प्रकारचे प्रलोभन किंवा वस्तुंचे वाटप करण्यावर बंधन आहे, याची जाणीव मला आहे. या उपक्रमात माझा व्यक्तिश सहभाग नाही. मला अजून उमेदवारी जाहीर झाले नाही. माझा कसब्यातून विजय पक्का असल्याने विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांतून नागिरकांना दिवाळीनिमित्त वस्तूंचे वाटप सुरू आहे. माझा मित्र परिवार नागरिकांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांचे वाटप कोण रोखणार, असा प्रश्न धंगेकर यांनी उपस्थित केला आहे. माझ्यावर जर गुन्हा दाखल होऊ शकतो, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.