पुणे : हत्तीच्या केसांपासून तयार करण्यात आलेले ब्रेसलेट्स, तसेच अंगठ्यांची विक्री केल्याच्या आरोपावरून विश्रामबाग पोलिसांनी शहरातील एका सराफ व्यावसायिकाविरुद्ध वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्याच्या दुकानातून जप्त करण्यात आलेले दागिने पडताळणीसाठी वन विभागाच्या पथकाकडे सोपविण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हत्तीचे केस बाळगणे, तसेच विक्री करणे हा वन्यजीव कायद्याने गुन्हा आहे. हत्तीच्या केसांचे दागिने बनवून त्याची विक्री केल्याच्या आरोपावरून कुमठेकर रस्त्यावरील व्ही. आर. घोडके सराफ या पेढीच्या मालकांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका वन्यजीवप्रेमी सामाजिक कार्यकर्त्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – महायुतीला मतदान न करण्याची कोणी केली प्रतिज्ञा!

हेही वाचा – पुणे: फटाक्यांच्या धूरामुळे गंभीर अपघात, दोन दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात चौघे जण जखमी

हत्तीचे केस धारण केल्याने शक्ती आणि संरक्षण मिळते, अशी धारणा दक्षिणेकडील नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यात हत्तींच्या केसांपासून तयार करण्यात आलेले ब्रेसलेट आणि अंगठ्या वापरण्याचे प्रमाण मोठे आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातही हत्तीच्या केसांपासून तयार करण्यात आलेले ब्रेसलेट आणि अंगठ्या वापरण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. कुमठेकर रस्त्यावरील के. व्ही. घोडके सराफ पेढीकडून हत्तीच्या केसांचे ब्रेसलेट्स आणि अंगठ्यांची विक्री केली जात होती. याबाबत रेडिओवर जाहिरातही प्रसारित करण्यात आली होती. ही जाहिरात ऐकून एका वन्यप्रेमीने बनावट ग्राहक पाठवून अंगठीची खरेदी केली. अंगठी तपासून पाहिली. तेव्हा अंगठीत हत्तीचे केस आढळून आले. त्यानंतर वन्यजीव प्रेमी कार्यकर्त्याने तक्रार केली. पोलिसांच्या पथकाने सराफी पेढीवर छापा टाकून तेथून हत्तीच्या केसांपासून तयार करण्यात आलेल्या अंगठ्या आणि ब्रेसलेट जप्त केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case against sarafa in pune selling elephant hair jewellery action under wildlife act pune print news rbk 25 ssb