पुणे: सुनेशी अश्लील वर्तन करणाऱ्या सासऱ्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ३२ वर्षीय सुनेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार ६२ वर्षीय सासऱ्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदार महिला आणि तिच्या पतीचा वाद झाला होता. ती वेगळी राहत होती. सून ही हिंगणे खुर्द परिसरातील एका मंदिरासमोर थांबली होती. त्या वेळी सासरा तेथे आला. ‘आपल्या समाजात दुसरे लग्न करायची प्रथा नाही. मी तुला सदनिका घेऊन देतो.

हेही वाचा… पुणे: पदपथावर झोपण्याच्या वादातून ज्येष्ठाचा खून; खडकीतील घटना

मुलगा आणि सासूला सांगू नको. मी तुझा सांभाळ करेन’, असे सांगून सासऱ्याने सुनेचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case against the father in law who behaved obscenely with the daughter in law in sinhagad road pune print news rbk 25 dvr