पुणे : नववर्ष साजरे करण्यासाठी एका हाॅटेलमध्ये गेलेल्या तरुणासह दोन तरुणींना बाउन्सरकडून मारहाण करण्यात आल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. या प्रकरणी तीन बाउन्सरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फयीम शमीम शेख (वय २२, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी तीन बाउन्सरच्या विरोधात मारहाण, तसेच विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – कात्रज भागातील गृहप्रकल्पातून बांधकाम साहित्य चोरणारे गजाआड
फयीम आणि दोन मैत्रिणी वडगाव शेरीतील हाॅटेल जिप्सी बार अँड किचनमध्ये नववर्ष साजरे करण्यासाठी गेले होते. त्या वेळी हाॅटेलच्या मालक जास्मीन यांच्या अंगावर दारू सांडल्याने वाद झाला. तेथे असलेल्या तीन बाऊन्सरने फयीमला मारहाण केली. फयीमच्या मैत्रिणींना धक्काबुक्की केली. सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.