पुणे: टिळक रस्त्यावर कपडे खरेदीसाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शहरात कोयते विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी शहराच्या मध्यवस्तीतील कोयते विक्री करणाऱ्या ठिकाणांहून कोयते जप्त केले आहेत. तरीही ऐन दिवाळीत कोयता गॅंग पुन्हा सक्रिय झाली असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा… VIDEO: फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ठिकाणी आगीच्या घटना; ११ घरांना आग

अक्षय मलाप्पा शिंगे (वय २५, रा. महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत शिंगे याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय, त्याचे मित्र करण धिवार, मुज्जमीर शेख दिवाळीनिमित्त टिळक रस्त्यावरील वस्त्र दालनात खरेदीसाठी आले होते. त्यावेळी पदपथावरुन आलेल्या तिघांनी शिंगेवर कोयत्याने वार केले. सहायक पोलीस निरीक्षक नानेकर तपास करत आहेत.

Story img Loader