लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक मधुकांत गरड यांच्यासह २० ते २५ जणांच्या विरुद्ध मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका लिंबू विक्रेत्या महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार मधुकांत गरड, फळबाजार विभागाचे प्रमुख दत्तात्रय कळमकर, संभाजी काजळे, अमोल घुले यांच्यासह २० ते २५ जणांच्या विरुद्ध जातीवाचक शिवीगाळ तसेच विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीने श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डच्या आवारातील बेकायदा फळ विक्रेते तसेच लिंबू विक्रेत्यांच्या विरुद्ध कारवाई केली. फळबाजारात बेकायदा व्यवसाय करणाऱ्या लिंबू विक्रेत्यांनी कारवाईच्या निषेधार्थ मार्केट यार्डच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले होते.

आणखी वाचा- पुणे: बांधकाम व्यावसायिकाकडे ३० लाखांची खंडणी; तिघांविरुद्ध गुन्हा

कारवाई करताना बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्यासह २० ते २५ जणांनी जातीवाचक शिवीगाळ केली तसेच अश्लील शिवीगाळ केल्याची फिर्याद लिंबू विक्रेत्या महिलेने दिली आहे. वानवडी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मार्केट यार्डाच्या आवारात बेकायदा व्यवसाय करणारे फळ विक्रेते, लिंबू विक्रेत्यांच्या विरुद्ध कारवाई केली होती. बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांमुळे बाजार आवारात वाहतूक कोंडी होत होती. कारवाईनंतर बाजार आवारातील वाहतुकीचा प्रश्न सुटला होता. ज्या महिलेने जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे. त्या महिलेला आम्ही ओळखत देखील नाही. -मधुकांत गरड, तत्कालिन प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case file against administrator of the market committee madhukar garad pune print news rbk 25 mrj
Show comments