पुणे : जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात कंपनीच्या वतीने व्यवहार करताना कंपनीला पूर्वकल्पना न देता जमिनीची परस्पर विक्री करुन १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरीतील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रामकृष्ण गोविंदस्वामी पिल्ले ऊर्फ राजेश पिल्ले (वय ५२, रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे.याबाबत संजयदयानंद ओसरमल (वय ३९, रा. पिंपरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रम्हाकॉर्प लि. ही रामकुमार अगरवाल यांची कंपनी असून ते संचालक आहेत. त्यांच्यावतीने जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये राजेश पिल्ले विश्वस्त प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते. त्यांनी चर्होली येथील मिळकत कंपनीचे संचालक रामकुमार अगरवाल यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर संतोष सोपानराव लांडगे आणि धनंजर हनंमत लांडगे (रा. पिंपरी) यांना खरेदी खताने विक्री केली. ब्रम्हाकॉर्प कंपनीचा विश्वासघात करुन १५ कोटी रुपयांचा अपहार करुन आर्थिक फसवणूक केली़. पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करीत आहेत.