लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: कोंढवा भागात एका नियोजित गृहप्रकल्पाचे काम बंद पाडण्याची धमकी देऊन बांधकाम व्यावसायिकाकडे ३० लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांच्या विरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला.

शफी पठाण, साजीद पठाण, साजिद (तिघे रा. पारगेनगर, कोंढवा खुर्द) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोंढव्यातील पोकळे मळा परिसरात सात गुंठे जागा आहे. त्या पैकी चार गुंठे जागेवर बांधकाम व्यावसायिकाने भागीदारीत गृहप्रकल्पाचे काम सुरु केले आहे. आरोपी पठाण आणि साथीदार साजिद बांधकाम व्यावसायिकाला भेटले. या भागात आमचे वजन आहे. बांधकाम सुरु ठेवायचे असेल तर ३० लाखांची खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाला दिली.

आणखी वाचा- पिंपरीत २०२६ पर्यंत ५० टक्के ई-रिक्षांचा वापर करण्याचे लक्ष्य

आरोपींनी एकाच्या नावावर एक सदनिका करुन देण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकाकडे केली होती. बांधकाम व्यावसायिकाने खंडणी देण्यास नकार दिल्याने आराेपींनी बांधकाम बंद पाडले. घाबरलेल्या बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case file against three people who extorted 30 lakhs to the builder pune print news rbk 25 mrj
Show comments