पुणे : पैगंबर जयंतीनिमित्ताने काढलेल्या मिरवणुकीत झेंडा फडकावणाऱ्या दोन तरुणांचा उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरीतील भाजी मंडई परिसरात घडली. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी वडगाव शेरीतील मिम बाॅईज फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष हुसेन कादर शेख (वय ३५, रा. वडगाव शेरी), विकास अच्युत कांबळे (वय ३२), अक्षय बापू लावंड (वय २८), संतोष धावजी दाते (वय ३६, रा. राजगुरूनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभय अमाेल वाघमारे (वय १७), जक्रीया बिलाल शेख (वय २०, दोघे रा. वडगाव शेरी) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार पंकज मुसळे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
tempo hit on Satara road, Woman died Satara road,
सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना

हेही वाचा – लोणी काळभोरमधील ‘ऑइल माफिया’ प्रवीण मडीखांबेसह साथीदारांवर मोक्का कारवाई, पेट्रोल-डिझेल चोरीतून कोट्यवधींची संपत्ती

वडगाव शेरी परिसरात रविवारी पैगंबर जयंतीनिमित्त मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. साडेदहाच्या सुमारास वडगाव शेरी भाजी मंडई परिसरात मिरवणूक आली. त्या वेळी अभय वाघमारे आणि काही तरुण झेंडा फडकावत होते. झेंडा लोखंडी गजाला लावण्यात आला होता. झेंडा फडकाविताना झेंड्याचा धक्का उच्च क्षमतेच्या वीज वाहिनीला लागला. झेंडा लोखंडी गजाला लावलेला असल्याने गजात विद्युतप्रवाह उतरला आणि विजेच्या धक्क्याने अभय खाली कोसळला. शेख यालाही विजेचा धक्का बसला. दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – पुणे : पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन ताब्यात, कात्रज भागात पोलिसांची कारवाई

सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. चौकशीत मंडळाचे अध्यक्ष शेख यांनी पोलिसांनी दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आले, तसेच कांबळे याने ट्रॅक्टरवर लाकडी फळी टाकून स्टेज बांधला. लावंड आणि दाते यांनी ध्वनीवर्धक आणि एलईडी स्क्रीन ट्रॅक्टरवर बसविली. त्यामुळे देखाव्याची उंची मर्यादेपेक्षा जास्त झाल्याने दुर्घटना घडली, असे पाेलीस हवालदार मुसळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.