लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांना रुग्णालयात तोडफोड करुन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना भारती हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सहा नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

due to torture of wife and in laws youth committed suicide
पत्नीच्या छळामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नी,सासूसह मेहुणीविरुद्ध गुन्हा दाखल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Pune BJP Shiv Sena corporators
शिवसेना नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये नाराजी, काय आहे कारण ?
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Assistant Commissioner shreenivas dangat loses job due to third child
पिंपरी : तिसऱ्या अपत्यामुळे सहायक आयुक्ताने गमावली नोकरी
Girl's Hair Cut case At Dadar Station
“म्हणून मी तिचे केस कापले…”, दादर स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा
Man Grabs Leopard By Tail
Video: गावकऱ्याची कमाल, पळणाऱ्या बिबट्याची शेपटी पकडून धरून ठेवलं अन् लोकांचा जीव वाचवला; व्हिडीओ होतोय व्हायरल
Image of the Supreme Court building
Ladki Bahin Yojana : “सरकारकडे ‘लाडकी बहीण’ सारख्या योजनांसाठी पैसे आहेत पण…”, मोफत पैसे देण्याच्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचा संताप

याबाबत डॉ. अंकिता अर्पित ग्रोवर (वय ३६) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महाराष्ट्र वैद्यकीय संस्था अधिनियम, तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावरील भारती हॉस्पिटल रुग्णालयात एका ८६ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मंगळवारी (७ जानेवारी) मृत्यू झाला. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे जैन यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करुन नातेवाईकांनी बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांना रुग्णलायातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा-शिवसेना नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये नाराजी, काय आहे कारण ?

सुरक्षारक्षक तृप्ती लोखंडे, श्रीदेवी डोईफोडे, निर्मला लष्कर, तसेच रुग्णलायातील कर्मचारी सुनील दाते, अतुल शिंदे, चैतन्य दधस, प्रशांत ओव्हाळ यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. रुग्णालयात आरडाओरडा करुन त्यांनी लाकडी स्टुल रुग्णलयातील केबीनच्या काचेवर फेकून मारला. या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात तपास करत आहेत.

Story img Loader