पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह भाषेत ध्वनिचित्रफीत प्रसारित केल्या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… पुणे: बोपदेव घाटात तरुणाचा खून प्ररणाचा उलगडा; मित्रांकडून तरुणावर पिस्तुलातून गोळीबार, तिघे अटकेत

या प्रकरणी समाजमाध्यमावरील सचिन १४१४ नावाचा खातेधारकासह तिघांच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सनी किरण लांडे (वय ३२, रा. जयभवानीनगर, पौड रस्ता) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह भाषा वापरुन ध्वनिचित्रफीत तयार करुन प्रसारित करण्यात आल्याचे लांडे यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. ध्वनिचित्रफीमध्ये दोघे जण आक्षेपार्ह भाषेत पाटील यांच्या विषयी वक्तव्य करत असल्याचे आढळून आले आहे. ज्या खात्यावरुन ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात आली आहे. त्या खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बढे तपास करत आहेत.

हेही वाचा… पुणे: पुरस्कार रद्दच्या निषेधार्थ लक्ष्मीकांत देशमुख यांचा भाषा सल्लागार समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

तिसरा गुन्हा दाखल

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर; तसेच शिवीगाळ करणारा मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी वारजे आणि कोथरुड पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case filed by kothrud police for audio video recording of chandrakant patil in offensive language on social media pune print news rbk 25 asj