शिरुर : अश्लील वर्तन करण्यास मुभा देणा-या शहरातील ‘ द स्टीम रुम ‘या कॅफे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना शिरूर शहर व परिसरातील शाळेतील तसेच कॉलेजमधील मुले मुलींना अश्लील वर्तन करण्यास मुभा देण्यासाठी’ द स्टीम रुम ‘ या कॅफेमध्ये अवैध पार्टेशन केले असुन त्यामध्ये काही शाळकरी मुले व मुली हे असभ्य व अश्लील वर्तन करीत असलेबाबत माहिती मिळाली होती . त्यानुसार सदर कॅफेवर तात्काळ कारवाई करणेबाबतचे आदेश पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तपास पथकाला दिले होते.
त्यानुसार पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार नितेश थोरात, रविंद्र आव्हाड हे साध्या वेशात शिरूर शहारामधील रेव्हेन्यु कॉलनी येथील या कॅफेमध्ये जावुन नाष्टा ऑर्डर देवुन बसले असताना तेथे काही मुले व मुली कॅफे चालकाने पार्टेशन केलेल्या रूममध्ये बसुन असभ्य व अश्लील कृत्य करताना आढळून आले तसेच अजुन काही शाळकरी मुले व मुली देखील तेथे येत असल्याचे दिसुन आले . कॅफे चालक आकाश रमेश लभडे वय २३ वर्ष रा. अरणगाव, ता .श्रीगोंदा जि. अहिल्यानगर याचेवर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर १५६/२०२५ भा न्या संहिता कायदा कलम २९६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याबाबत पोलीस अमंलदार रविंद्र बापुराव आव्हाड यांनी फिर्याद दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार देविदास खेडकर हे करीत आहेत. या कॅफे चालकावर यापुर्वी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे ,यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोसई शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, देवीदास खेडकर, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अमंलदार सचिन भोई, नितेश थोरात, रविंद्र आव्हाड, निरज पिसाळ, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केला .