लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे: वारजे माळवाडी भागातील जयभवानी चौक परिसरात सराइतावर भरदिवसा गोळीबार करून पसार झालेल्या तीन जणांना पोलिसांनी पकडले. गोळीबार करणारे तिघे जण अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत.
वारजे भागातील जयभवानी चौकात क्रिक्रेट खेळणाऱ्या सूरज तात्याबा लंगर (वय २१, रा. वारजे माळवाडी) याच्यावर शनिवारी दुपारी चारच्या सुमारार दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी गोळीबार केला. जीव वाचविण्यासाठी पळालेल्या सूरजचा पाठलाग करुन त्याच्यावर पिस्तूलातून गोळीबार करण्यात आला होता. एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे तरुणाचा पाठलाग करुन गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. वारजे पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर होते. लंगर याच्यावर गोळीबार करणारे आरोपी पुण्याबाहेर पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस नाईक प्रदीप शेलार आणि बंटी मोरे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने तिघांना चांदणी चौक परिसरात पकडले. त्यांची झडती घेण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे देशी बनावटीची दोन पिस्तूले सापडली. गोळीबार करणारे तिघे अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले आहे.
आणखी वाचा-पाऊस लांबल्याने पेरण्या रखडल्या, कडधान्य पेऱ्यात मोठी घट शक्य; दुबार पेरणीचेही सावट
अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डी. एस. हाके, गुन्हे शाखेच निरीक्षक दत्ताराम बागवे, उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, रामेश्वर पार्वे, पोलीस नाईक प्रदिप शेलार, अमोल राऊत, हनुमंत मासाळ, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, विकी खिलारी आदींनी ही कारवाई केली.