पुणे : सारसबागेमध्ये नमाज पठण केल्याप्रकरणी पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ मे २०२२ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संदीर गोडसे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पाच ते सहा अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सारसबाग या पुण्यातील प्रसिद्ध उद्यानामध्ये तळ्यातील गणपती मंदिर आहे. पुणे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या या उद्यानात ५ मे रोजी पाच ते सहा व्यक्तींनी प्रवेश केला. त्यानंतर सारसबागेतील गणपती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडजवळील हिरवळीवर एकत्र येत त्यांनी नमाज पठण केले.
हेही वाचा…Pooja Khedkar : पुणे पोलिसांची नोटीस धडकताच पूजा खेडकरांच्या बंगल्यातून मोटार गायब
महापालिकेच्या मुख्य अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या मंडळी जमवून गैरकृत्य केले. इतर समाजाच्या भावना दुखावून जातीय तेढ निर्माण करण्यासाठी नमाज पठण केल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदे पुढील तपास करीत आहेत.