पुणे : शाळेतील रोखपाल महिलेने १६ लाख ६९ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रोखपाल महिलेविरुद्ध लाेणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत शाळेच्या संचालकांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शाळेतील रोखपाल महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहार केल्याचा प्रकार १० जानेवारी २०२३ ते २१ जून २०२४ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेली महिला लोणी काळभोर भागातील एका शाळेत रोखपाल होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राथमिक, पूर्व प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शैक्षणिक शुल्क, तसेच गणवेशासाठी दिलेले शुल्क शाळेतील प्रशासनाकडे जमा करण्यात आले होते. रोखपाल महिलेने १४ लाख ४५ हजार रुपयांचा अपहार केला. लेखापरीक्षणात महिलेने अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. शाळेतील संचालकांच्या दालनात तिने प्रवेश केला. कप्यात ठेवलेली दोन लाख ४४ हजार रुपयांची रोकड, तसेच हिशेबाची पुस्तके, पावत्या चोरुन नेल्या, असे संचालकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case registered against school cashier for embezzling rs 16 lakh pune print news rbk 25 amy