लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मुळशी तहसील कार्यालयाअंतर्गत खोट्या कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Investors in Dombivli cheated of 81 lakhs with false promise of 90 bungalow row house project
रो हाऊस प्रकल्पातील गुंतवणुकीतून, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ८१ लाखाची फसवणूक
Cash worth Rs 3 lakh stolen from school on Law College Road Pune news
पुणे: विधी महाविद्यालय रस्त्यावरील शाळेतून तीन लाखांची रोकड चोरी
pimpri chinchwad cyber crime loksatta news
सायबर क्राइम : महिन्याला दहा टक्के परतावा? उच्चशिक्षित तरुणाची ८० लाखांची अशी झाली फसवणूक…
Jitendra Awhad vs Dhananjay Munde
“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचं, ती गँग बटण दाबायची”, व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा
ec hearing against district collector dr sachin ombase for obstructing election process
लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांचा सावळा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून दखल; जिल्हाधिकार्‍यांची सुनावणी
nagpur crime news
उपराजधानीत तोतया पोलिसांचा सुळसुळाट, अजनी पोलीस ठाण्यासमोरच…

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत २०३ भोर मतदार संघ ता. मुळशी येथील पिरंगुट, यादी भाग क्र. २०४ मुकाईवाडी येथे मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणात अर्ज क्र. ६ दाखल करण्यात आले. या अर्जासोबत रहिवासी पुरावा म्हणून विद्युत देयक जोडण्यात आले होते. या बाबत शंका आल्याने महावितरणच्या संकेतस्थळावर पडताळणी केली असता विद्युत देयकांवरील नाव, पत्त्यात तफावत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी खोटे विद्युत देयक रहिवासी पुरावा म्हणून सादर केल्याबद्दल विजय मारणे, अमित शिंदे, भाऊसाहेब मोकर, शकील अहमद, महंमद आलम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-पुणे जिल्ह्यात दीड लाख मतदारांचे चेहरे एकसारखे… आता काय होणार?

अशा प्रकारच्या घटना आपल्या परिसरात घडत असल्याचे निदर्शनास आल्यास नजीकच्या तहसील किंवा तलाठी कार्यालय, पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, २०३ भोर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी भोर तसेच तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी रणजीत भोसले यांनी केले आहे.

Story img Loader