पुणे : पोलीस चौकीत गोंधळ घालून पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शनिवार पेठ पोलीस चौकीत ही घटना घडली.

याप्रकरणी एका २२ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई प्रसाद ठाकूर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला तरुण नारायण पेठेत राहायला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या मध्यरात्री एकच्या सुमारास दुचाकीस्वार तरुण भरधाव वेगात ओंकारेश्वर मंदिरापासून निघाला होता. त्यावेळी त्याने एका दुचाकीस्वार महिलेला धडक दिली. अपघातात महिलेच्या दुचाकीचे नुकसान झाले. त्यानंतर महिलेने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. बंदोबस्तावरील पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. त्याला शनिवार पेठ पोलीस चौकीत नेले. तेव्हा त्याने पोलीस चौकीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Santosh Deshmukh muder case
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक; सूदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात
Ramtekadi dumper and JCB burnt
पुणे: रामटेकडीत डंपर, जेसीबी यंत्र पेटवून देण्याची घटना; ठेकेदाराकडून पोलिसांकडे तक्रार
Ajit Pawar Baramati Vidhansabha
Ajit Pawar Baramati : “बारामतीत लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं मतदारांनी ठरवलं होतं”, अजित पवारांचं विधान चर्चेत!
Image Of Sharad Pawar And Supriya Sule.
“शरद पवार व सुप्रिया सुळेंनी आता घरी बसावं”, भाजपा मंत्र्यांची खोचक टिप्पणी!
Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान
Karnataka auto driver finds the house of passenger to return her missing gold chain, receives accolades.
VIDEO: लाखाला भारी पडला प्रामाणिकपणा! महिलेची सोन्याची चैन परत करण्यासाठी रिक्षा चालकानं काय केलं पाहा

हे ही वाचा… ‘राजगुरुनगर’ अत्याचार प्रकरणात आरोपीला न्यायालयीन कोठडी

हे ही वाचा… प्रशासकीय राजवटीत विकासकामांना खीळ, पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत ९०० कोटी शिल्लक; नऊ महिन्यांत केवळ ३७ टक्के रक्कम खर्च

पोलीस चौकीत त्याने तक्रारदार महिलेसह पोलिसांना शिवीगाळ केली. पोलीस शिपाई ठाकूर आणि इनामदार यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर तपास करत आहेत.

Story img Loader