लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : वडगाव शेरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार बापू पठारे यांना पाठिंबा दिल्याने माजी नगरसेविका रेखा टिंगेर यांचे पती चंद्रकांत यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. टिंगरे यांना मारहाण करणाऱ्या दोघांनी मोटारीवर दगडफेक करुन नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत चंद्रकांत टिंगरे यांच्या पत्नी रेखा (वय ५२, रा. कमल निवास, भैरवनगर, धानोरी ) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माझे पती चंद्रकांत टिंगरे यांनी आठ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (अजित पवार गट) शरद पवार गटात प्रवेश केला. वडगाव शेरीतील उमेदवार बापू पठारे यांना पाठिंबा दिल्याने विरोधक आमच्यावर चिडून होते. चंद्रकांत टिंगरे मंगळवारी दुपारी धानोरी भागातून निघाले होते. त्यावेळी दोघांनी मोटार अडविली. मोटारीवर दगडफेक करुन पती चंद्रकांत यांना मारहाण केली, असे रेखा टिंगरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी वाचा-Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोथरूडमध्ये पहिल्या दोन तासात मतदानासाठी उत्साह

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. टिंगरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली होती. पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case registered for assaulting chandrakant tingre pune print news rbk 25 mrj