पुणे : दहीहंडी उत्सवात लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्याबाबत पोलिसांनी दिलेले आदेश धुडकाविणाऱ्या मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली. पोलिसांकडून चार मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.दहीहंडी उत्सवात घातक लेझर दिव्यांवर बंदी घालण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले होते. मंगळवारी चौकाचौकांत दहीहंडी साजरी करणाऱ्या अनेक मंडळांनी आदेश धुडकावून लावल्याचे निदर्शनास आले. ध्वनिक्षेपकांच्या भिंती उभारून ध्वनिपातळीच्या मर्यादेचेही उल्लंघन झाल्याचे आढळले. पोलिसांचे आदेश धुडकाविणाऱ्या चार मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

दहीहंडीत लेझर दिवे, तसेच ध्वनीवर्धकांच्या आवाजाच्या त्रास झाल्याच्या तक्रारी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे करण्यात आल्या होत्या. मंगळावारी रात्रीपर्यंत पोलीस नियंत्रण कक्षाकडे १२ तक्रारी करण्यात आल्या होत्या. आदेश धुडकावून लेझर दिव्यांचा वापर आणि ध्वनीवर्धकांचा वापर केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या परिमंडळ दोन आणि परिमंडळ पाचमधील चार मंडळांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ नसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे पोलिसांच्या विशेष शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

bombay high court orders to stand with dont drink and drive banner at traffic junction
सिग्नलवर ‘दारू पिऊन वाहन चालवू नका’चा फलक घेऊन उभा राहा ; उच्च न्यायालयाची आगळी शिक्षा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Raid on service center that is committing online fraud under the guise of providing loans Mumbai print news
मुंबईः कर्ज देण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सेवा केंद्रावर छापा; ७ जणांना अटक
pimpri chinchwad police commissioner vinay kumar choubey on illegal money lending
पिंपरी : अवैध सावकारी करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई; पोलीस आयुक्तांचा आदेश
security forces killed 14 naxalites
छत्तीसगड-ओडिशा सीमेवर चकमकीत १४ नक्षलवादी ठार
accused akshay shinde encounter
अन्वयार्थ : हत्येचा गुन्हा दाखल कराच
mumbai police Saif Ali Khan attacker thane CCTV cameras
सीसीटीव्ही कॅमेरे, जी-पे चा वापर नि मोबाइल क्रमांक…अभिनेता सैफ अली खानच्या हल्लेखोरापर्यंत मुंबई पोलीस ठाण्यात कसे पोहोचले?
Maharashtra Pollution Control Board takes action due to noise pollution caused by Reliance Jio company office 
बड्या दूरसंचार कंपनीला दणका; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचे पाऊल

हेही वाचा >>>पुण्यात गरीब रुग्णांवर खासगी रुग्णालयात मोफत उपचार? माहिती अधिकारात आलं वास्तव समोर…

ज्या मंडळाकडून ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाले आहे आणि लेझर प्रकाशझोतांचा वापर करण्यात आला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना व्हिडिओ चित्रीकरण करण्याच्या सूचना सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले होते. लोहगाव परिसरात हवाई दलाचा तळ आणि नागरी विमानतळ आहे. लेझर दिव्यांमुळे वैमानिकांचे डोळे दिपून गंभीर स्वरुपाचे अपघात घडण्याची शक्यता असल्याने सहपोलीस आयुक्त शर्मा यांनी साठ दिवस शहरात लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घातली आहे.

Story img Loader