बाजीराव रस्ता: १६ पैकी एकच एटीएम सुरू
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर ‘एटीएम’ केंद्रांवर त्याचा परिणाम झाला असून नागरिकांना पैशांची आवश्यकता असली तरी ‘एटीएम’मध्ये पैसे मिळत नाहीत हे वास्तव आहे. बाजीराव रस्त्यावरील १६ एटीएम केंद्रांपैकी केवळ एकच एटीएम केंद्र सोमवारी सुरू होते आणि तेथे पैसे मिळविण्यासाठी नागरिकांची रांग लागली होती.
निश्चलीकरणाचे धोरण स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० दिवसांची मुदत मागून घेतली होती. त्याला मंगळवारी (२० डिसेंबर) ४० दिवस होत आहेत. आता बँकेतून ठराविक रक्कम काढता येत असली तरी बहुतांश बँकांची एटीएम केंद्र अद्यापही कार्यान्वित झालेली नाहीत. बाजीराव रस्त्यावर वेगवेगळ्या बँकांची १६ एटीएम केंद्र आहेत. त्यापैकी बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम केंद्र सोमवारी सुरू होते. या केंद्रावरून प्रत्येक खातेदाराला दोन हजार रुपये काढता येत होते. अर्थात हे दोन हजार रुपये म्हणजे गुलाबी रंगाची नोटच नागरिकांना मिळत होती. मात्र, तेवढी रक्कम मिळविण्यासाठी नागरिकांची रांग लागली होती. ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीने सोमवारी बाजीराव रस्त्यावरील एटीएम केंद्राची पाहणी केली. मित्रमंडळ चौक ते शनिवारवाडा म्हणजेच नवा पूल कोपरा या रस्त्यावर विविध बँकांची १६ एटीएम केंद्र आहेत. त्यापैकी बँक ऑफ महाराष्ट्र हे केवळ एक एटीएम केंद्र सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळात सुरू होते.
विविध बँकांच्या एटीएम केंद्रांची सोमवारची परिस्थिती
एटीएम पाहणीची वेळ : दुपारी एक ते तीन (बँकेचे नाव, स्थळ, दिसलेली स्थिती या क्रमाने..)
- कॉपरेरेशन बँक- सारसबाग- एटीएम सुरू होते. पण पैसे नसल्याने कितीही वेळा कार्ड टाकले तरी पैसे मिळत नव्हते.
- आयडीबीआय बँक- स्वारगेट मित्रमंडळ चौक- एटीएम केंद्राचे शटर खाली घेण्यात आले होते.
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया- पूरम चौक- एटीएम सुरू असले तरी रोकड मिळत नव्हती.
- बँक ऑफ बडोदा- सणस प्लाझा- एटीएम केंद्रात केवळ पासबुक भरून देण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- अॅक्सिस बँक- नातूबाग- एटीएम केंद्र पूर्णत: बंद होते.
- जनता सहकारी बँक- शनिपार- तांत्रिक कारणामुळे एटीएम केंद्र बंद असल्याचा फलक लावण्यात आला आहे.
- बँक ऑफ महाराष्ट्र- शनिपार- एटीएम केंद्र सुरू असून खातेदाराला दोन हजार रुपये काढता आले.
- अॅक्सिस बँक- आनंदाश्रम नूमविशेजारी- एटीएम केंद्र बंद होते.
- सारस्वत बँक- आप्पा बळवंत चौक- शंभर रुपयांच्या नोटांचा तुटवडा असल्याने एटीएम केंद्र बंद होते.
- स्टेट बँक ऑफ इंडिया- प्रभात चित्रपटगृहाजळ- एटीएम केंद्र बंद होते.
- आयसीआयसीआय बँक- प्रभात चित्रपटगृहाजवळ- एटीएम केंद्र बंद होते.
- कॅनरा बँक- दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर- एटीएम केंद्र बंद होते.
- बँक ऑफ इंडिया- दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर- एटीएम बंद होते.
- विश्वेश्वर सहकारी बँक- दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर- एटीएम केंद्र बंद होते.
- स्टेट बँक ऑफ इंडिया- नवा पूल कोपरा- एटीएम केंद्र बंद होते.
- अॅक्सिस बँक- नवा पूल कोपरा- एटीएम केंद्र बंद होते.