कसबा विधानसभा पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढविण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित करत सावध भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने कसब्यातून निवडणूक लढवावी, अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. मात्र, महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याबाबतची माहितीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना कळविण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसबा विधानसभा मतदारसंघासाठीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविण्याचे निश्चित करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या जागा वाटप सूत्रानुसार कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळेल, अशी शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचाच कसब्यावर दावा करण्याचा प्रयत्न नेत्यांकडून सुरू झाला आहे.

हेही वाचा – पुणे : सदोष नदीकाठ सुधार योजनेसाठी विद्यार्थी वेठीस? लोकसहभागाच्या नावाखाली प्रतिज्ञापत्रक देण्याची सक्ती

कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. या मतदारसंघावर काँग्रेसबरोबरच शिवसेनेनेही दावा केल्याने तूर्त ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनीही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भाजपच्या उमेदवारापुढे कोणत्या पक्षाचे आव्हान असेल, याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने तूर्त सावध भूमिका घेत महाविकास आघाडी म्हणून पोटनिवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेच कसब्यातून निवडणूक लढवावी, असा सूर पक्षाच्या एका गटाकडून व्यक्त होत आहे. मात्र महाविकास आघाडी म्हणून पोटनिवडणूक लढविण्यात यावी, असा निर्णय पक्षाच्या बैठकीत झाला असून त्याबाबतची माहिती वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार पक्षाची पुढील भूमिका निश्चित केली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लांबणीवर पडली असून ती येत्या दोन ते तीन दिवसांत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ठाणे : अंबरनाथमध्ये रेल्वे अपघातातील जखमी तरुणीचा मृत्यू, १४ दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज संपली

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या जागावाटप सूत्रानुसार विधानसभेची ही जागा काँग्रेसची आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता असली तरी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केल्याने महाविकास आघाडीतही गोंधळ वाढण्याची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cautious stance of ncp in kasba determined to contest election as maha vikas aghadi pune print news ccp 14 ssb