केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत होणार असल्याचे सीबीएसईने जाहीर केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना मूल्यमापन परीक्षेच्या दिवशी उपस्थित राहणे शक्य नसल्यास त्याची परीक्षेची तारीख बदलून याच कालावधीत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- पुणे : पवनेच्या पात्रातील प्रदूषणाची आयुक्तांकडून पाहणी

सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापनाचे वेळापत्रक आणि मार्गदर्शक सूचना मंगळवारी जाहीर केल्या. त्यानुसार २ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत विद्यार्थ्यांची अंतर्गत मूल्यमापन परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा होईल. तर याच कालावधीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण सीबीएसईच्या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थी अनुपस्थित राहिल्यास ऑनलाइन प्रणालीत अनुपस्थितीची नोंद करावी. संबंधित विद्यार्थ्याची परीक्षा याच कालावधीत अन्य दिवशी घेऊन रिशेड्युल्ड अशी नोंद करण्याबाबत सीबीएसईने स्पष्ट केले.