पुणे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. एकूण ९२.७१ टक्के लागला असून, महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल ९०.४८ टक्के लागला. देशपातळीवर १ लाख ३४ हजार ७९७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

CBSE 12th Result 2022 : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीबीएससीने परीक्षा पद्धतीत बदल करून दोन सत्रांची परीक्षा घेतली. २६ एप्रिल ते १५ जून या कालावधीत परीक्षा घेण्यात आली. मात्र दरवर्षीच्या तुलनेत सीबीएससीचा निकाल यंदा लांबल्याने विद्यार्थी आणि पालकांना निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर सीबीएससीने निकाल जाहीर केला. देशपातळीवरील एकूण निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास सहा टक्क्यांनी घटला आहे. विद्यार्थ्यांमधील गुणांच्या स्पर्धेमुळे निर्माण होणारी अस्वस्थता लक्षात घेऊन गुणवत्ता यादी आणि विद्यार्थ्यांना श्रेणी न देण्याचा निर्णय सीबीएससीईने घेतला.

त्रिवेंद्रम विभाग ९८.८३ टक्के गुणांसह देशात आघाडीवर –

यंदा १५ हजार ७९ शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील  १४ लाख ४४ हजार ३४१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. परीक्षा दिलेल्या १४ लाख ३५ हजार ३६६ विद्यार्थ्यांपैकी १३ लाख ३० हजार ६६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सीबीएसीच्या विभागांमध्ये त्रिवेंद्रम विभागाने ९८.८३ टक्के गुणांसह देशात आघाडी घेतली. त्या खालोखाल बेंगळुरू विभागाचा निकाल ९८.१६ टक्के आणि चेन्नई विभागाचा निकाल ९७.७९ टक्के लागला. नोएडा विभागाचा निकाल सर्वांत कमी ९०.२७ टक्के लागला. विभागीय निकालात पुणे विभाग शेवटून तिसऱ्या स्थानी आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbse 12th result 2022 the result of pune division is 90 percent pune print news msr
Show comments