पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत बनावट परिपत्रके समाजमाध्यमात फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सीबीएसईने निकालाच्या संभाव्य तारखेबाबतची माहिती जाहीर केली आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल २० मेनंतर जाहीर केले जाऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशभरातून ३९ लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या दहावी आणि बारावीची परीक्षा दिली आहे. त्यात बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल या कालावधीत, तर दहावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी ते १३ मार्च या दरम्यान घेण्यात आल्या. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांमध्ये निकालाची तारीख नमूद केलेली बनावट परिपत्रके फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे समाजमाध्यमात फिरत असलेल्या निकालाच्या बनावट तारखांवर विश्वास न ठेवता अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन सीबीएसईकडून करण्यात आले होते.

हेही वाचा…‘एमआयएम’ची पुण्यातील ताकद दिसणार; ७ मे रोजी असदुद्दीन ओवेसी घेणार सभा

या पार्श्वभूमीवर सीबीएसईने अधिकृत संकेतस्थळाद्वारे संदेश प्रसारित केला आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल २० मेनंतर जाहीर केले जाऊ शकतात असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बनावट तारखांमुळे संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbse warns against fake circulars on result dates confirms class 10th and 12th results likely after 20 may pune print news ccp 14 psg