पुणे : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे वडील महादेव जाधव सोमवारी (२७ मार्च) कोथरूड परिसरातून बेपत्ता झाले. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. जाधव कुटुंबीयांनी यासंदर्भात अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार, केदारचे  जाधव याचे वडील महादेव जाधव कोथरूड भागातून सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घराबाहेर पडले. जाधव कुटुंबीय कोथरूड भागात वास्तव्याला आहेत. जाधव सकाळी रिक्षाने बाहेर गेले. मात्र, संध्याकाळपर्यंत ते परतले नाहीत. त्याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी त्वरित स्थानिक पोलीस ठाण्यात त्याबाबत फिर्याद नोंदवली. त्यानंतर विशेष पथकाकडे याबाबतचा तपास सोपवण्यात आला. संपूर्ण परिसरातील सीसी टीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या परिसरातील रिक्षा थांबे आणि रिक्षाचालकांकडून माहिती संकलनाचे काम हाती घेण्यात आले आहे.

Story img Loader