पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचबरोबर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या चोरट्यांची संख्याही वाढत आहे. महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणारा सराईत चोरटा स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गजाआड गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे रेल्वे स्थानकावर दिवसाला सुमारे दीड लाख प्रवाशांची ये-जा सुरू असते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही पुणे रेल्वे स्थानक अतिशय महत्वाचे आहे. यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने स्थानकावरील गैरप्रकारांवर लक्ष ठेवले जाते. रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) हे काम केले जाते. स्थानकातील संशयास्पद हालचालींवर आरपीएफकडून लक्ष ठेवले जाते. याच तपासणीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचा दागिने एका व्यक्तीने चोरल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्याच्या छायाचित्राच्या आधारे आरपीएफने त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली.

हेही वाचा >>> हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या कामाला गती, बाणेर रस्त्यावरील स्थानकाच्या ‘प्लॅटफॉर्म पिअर आर्म’ उभारणीला सुरुवात

स्थानक परिसरातील दत्त मंदिराजवळ हा चोरटा फिरत होता. त्यावेळी आरपीएफचे सहाय्यक फौजदार संतोष जायभाये आणि कर्मचारी रसूल सय्यद आणि विशाल माने यांनी त्याला पकडले. त्याच्याकडे त्यांनी चौकशी केली. मोतीलाल रेडीअप्पा पवार (वय २१, रायचूर, कर्नाटक) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या साथीदाराचे नाव देवराज शंकर पवार (वय २२, रायचूर, कर्नाटक) असे आहे. दोघांनी मिळून मागील सहा महिन्यांत सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे केले आहेत.

हेही वाचा >>> पिंपरी: शालेय जीवनातच शहरातील विद्यार्थ्यांना गंभीर आजारांचा विळखा

लोहमार्ग पोलिसांकडून अडीच लाखांचा ऐवज जप्त

आरपीएफने मोतीलाल याला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी त्याचा साथीदार देवराज याला अटक केली. लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेले सुमारे अडीच लाखांचे दागिने जप्त केले आहेत.