लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोडाउनमधील सीसीटीव्ही प्रणाली बंद पडल्याची तक्रार लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबीया यांनी सोमवारी (दि. १३ मे) केली होती. मात्र, इलेक्ट्रिशियन काम करत असल्याने एका सीसीटीव्हीची वायर निघाली होती. परंतु, संबंधित वेळेतील छायाचित्रीकरण हे उपलब्ध असून दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकार कविती द्विवेदी यांनी दिली.

Mahadev Jankar left Mahayuti, Gangakhed BJP,
‘सुंठे वाचून खोकला गेला’ जानकरांच्या भूमिकेनंतर गंगाखेडमध्ये भाजपला आनंद
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Prakash Solanke Majalgaon, Prakash Solanke latest news,
प्रकाश सोळंकेंच्या माजलगावमध्ये ‘तुतारी’ चा आवाज वाढला
Ramtek, Congress, Shivsena, Ramtek Shivsena,
रामटेकच्या बदल्यात कोकणात जागा, काँग्रेसचा शिवसेनेला प्रस्ताव
MLA Ganesh Naik objected to the inauguration programs navi Mumbai
उद्घाटनांवरून खडाखडी! गणेश नाईकांची आगपाखड; पालिका आयुक्तांचे प्रत्युत्तर
dispute in maha vikas aghadi over ballarpur constituency seat
काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर ठाकरे, शरद पवार गटांचा डोळा
Yuva Sena office bearer, Shinde group,
शिंदे गटातील युवा सेना पदाधिकाऱ्यासह अनेक नगरसेवकांचा रविवारी ठाकरे गटात प्रवेश?
chaos in badlapur thane over bjp candidate selection
ठाणे, बदलापुरात गोंधळ; ठाण्यात प्रक्रियेवर आक्षेप, तर निरीक्षकांसमोरच बदलापुरात वाद

आणखी वाचा-पुणे काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावावर बोगस मतदान!

द्विवेदी म्हणाल्या, कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान झालेली मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असून इलेक्ट्रेशियन काम करत असताना त्याने एक वायर काढलेली असल्याने दूरचित्रवाणीच्या पडद्यावर चित्रिकरण काही वेळ दिसत नव्हते. मात्र याबाबत तातडीने चौकशी करून संबंधित यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे