पुण्यात एका अनियंत्रित कारचा थरार पाहायला मिळाला. भरधाव वेगाने मागच्या दिशेने (रिव्हर्स) येणाऱ्या कारने हातगाडी उडवल्याची घटना घडलीय. अंगाचा थरकाप उडवणारा ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या कारने वेगाने मागे येत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाडीला जोराची धडक दिली. विशेष म्हणजे खाद्यपदार्थांच्या या हातगाडीजवळ यावेळी अनेक लोक उभे होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारने हातगाडीला धडक दिल्याने हातगाडीचं मोठं नुकसान झालं. गाडीच्या अवतीभवती असलेल्या लोकांचाही जीव धोक्यात आला. मात्र, या घटनेत जीवितहानी थोडक्यात टळली. या प्रकरणी हातगाडी चालक सुभाष मनोज भंडारी यांनी वाकड पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी कारचालक सुभाष दादासाहेब वाघमारे विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

व्हिडीओ पाहा

हेही वाचा : नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या कारची ऊसाच्या ट्रॉलीला धडक, भीषण अपघातात २ पोलिसांचा मृत्यू

पीडित सुभाष भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कारचालक सुभाष वाघमारेने कार चालवताना मद्यपान केलेले होते. त्याने भरधाव वेगाने मागच्या दिशेने कार चालवत हातगाडी उडवली. हातगाडीच्या अवतीभवती असलेल्या लोकांचा जीव अगदी थोडक्यात बचावला आहे. ही घटना ८ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता घडली. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv video of car accident in wakad pune hitting hawkers and people kjp pbs