पुणे : समाजातील बेरोजगारीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे बेरोजगारी व महागाईविरोधी प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. १७ सप्टेंबर या राष्ट्रीय बेरोजगार दिनानिमित्त बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन चायनीज स्टॉल चालविण्यात आला.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रथमेश विकास आबनावे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात अनोख्या पद्धतीने बेरोजगार दिन साजरा करण्यात आला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
प्रथमेश आबनावे म्हणाले, ‘देशात वाढत असलेली बेरोजगारी ही युवकांसाठी समस्या झाली आहे. तरुणांना चहा विकायलाही आता संधी उपलब्ध नाही. नोकरीच्या संधी कमी आहेत. महागाईमुळे तरुणांना बेरोजगार भत्ता मिळणे मुश्किल झाले आहे’
First published on: 19-09-2022 at 14:04 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrating national jobless day by running chinese stalls maharashtra pradesh youth congress pune print news tmb 01