पिंपरी : आरक्षणाच्या मागणीला यश मिळाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.
पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा, मराठ्यांच्या एकजुटीचा विजय, मनोज जरांगे-पाटील आगे बढो, अशा जोरदार घोषणा देत पिंपरीत जल्लोष साजरा करण्यात आला. जल्लोषात मराठा क्रांती मोर्चाचे मारुती भापकर, सचिन चिखले, नुकूल भोईर, धनाजी येळकर-पाटील सहभागी झाले होते.
हेही वाचा : “मराठा समाजाला आरक्षण मिळाले, पण…”; मराठा नेत्यांनी व्यक्त केली ‘ही’ भीती
मराठा समाजाच्या लढ्याला यश मिळाल्याचे मारुती भापकर यांनी सांगितले.