पुणे : अजित पवार यांनी उपमुख्यंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आणि या पदावर सहाव्यांदा विराजमान झाल्यानंतर बारामती येथे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला. बारामती शहरातील भिगवण चौकात यानिमित्त कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जबाबदारी स्वीकारली. महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार यांचे उपमुख्यमंत्रिपद निश्चित होते. त्यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार समर्थकांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. अजित पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.