आगामी शंभराव्या नाटय़संमेलनाचा मे महिन्यात पुण्यामध्ये जागर होणार आहे. जिल्ह्य़ातील सहा शाखा एकत्रित येऊन या संमेलनाचे आयोजन करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाचे यंदा शंभरावे वर्ष आहे. त्यामुळे कोणत्या तरी एका शहरात तीन दिवसांचे नाटय़संमेलन घेण्याऐवजी राज्याच्या वेगवेगळ्या भागांत नाटय़संमेलन आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेने घेतला आहे. या शृंखलेत पुण्यामध्ये मे महिन्यात नाटय़संमेलन घेण्यात येणार असून जिल्ह्य़ातील सहा शाखांनी एकत्रितपणे या संमेलनाचे यजमानपद भूषविण्याची संकल्पना पुढे आली.

मराठीतील आद्य नाटककार व्यंकोजी राजे यांना अभिवादन करून २५ मार्च रोजी नाटय़संमेलनाचा प्रारंभ होणार आहे. जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून २७ मार्च रोजी नाटय़पंढरी सांगली येथे नाटय़संमेलनाचे उद्घाटन होणार असून नाटय़ाचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १४ जून रोजी मुंबईमध्ये नाटय़संमेलनाचा समारोप होणार आहे. यादरम्यान राज्याच्या विविध भागांत नाटय़संमेलन घेतले जाणार आहे.

या शृंखलेमध्ये पुण्यात मे महिन्यामध्ये नाटय़संमेलन घेण्यात येईल. नाटय़ परिषदेची पुणे शाखा, कोथरूड, पिंपरी-चिंचवड, बारामती, दौंड आणि तळेगाव अशा सहा शाखा एकत्र येऊन नाटय़संमेलनाचे आयोजन करणार आहेत. या चार दिवसांच्या नाटय़संमेलनामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा लवकरच नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर कांबळी यांच्या सूचनेनुसार पुण्यातील नाटय़संमेलनाची घोषणा होईल, अशी माहिती नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.