पुणे : चीनमध्ये लहान मुलांना होणाऱ्या श्वसनविकाराची नवी साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या सज्जतेचा त्वरित आढावा घेण्याचे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना रविवारी दिले. चीनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष असून, कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

करोना संकटानंतर चीनमध्ये आता लहान मुलांच्या श्वसनविकाराची साथ आली आहे. यामुळे अनेक देशांनी सावधगिरीची उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सावधगिरीचा उपाय म्हणून आरोग्यविषयक उपाययोजनांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पसरलेली इन्फ्लूएन्झाची साथ आणि हिवाळय़ामुळे श्वसनविकारांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Uddhav Thackeray statement at Boisar that why Gujarat inspectors are helpless
गुजरातच्या निरीक्षकांची लाचारी का पत्करतात? उद्धव ठाकरे यांचा बोईसर येथे सवाल
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Ramdas Athawale, RPI pune, office bearers of RPI,
महायुतीची डोकेदुखी रिपाइं वाढणार ! खासदार रामदास आठवले यांच्याकडून रिपाइं पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड

हेही वाचा >>>आज कुठे होणार गारपीट? घ्या जाणून

श्वसनविकार संसर्गाच्या वाढीवर एकात्मिक रोग देखरेख प्रकल्पांचे जिल्हा आणि राज्य विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहेत की नाही याची खातरजमा करण्याची सूचनाही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली आहे. यात लहान मुले आणि अर्भके यांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, श्वसनविकारग्रस्त रुग्णांच्या नाक आणि घशातील स्रावांचे नमुने श्वसन विकार जनुकांच्या चाचणीसाठी राज्यांमध्ये असलेल्या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

जागतिक आरोग्य संघटना सतर्क

चीनच्या उत्तरेकडील भागात लहान मुलांमध्ये श्वसनविकाराची साथ पसरली आहे. या आजाराबाबत चीनकडून माहिती मागविण्यात आली आहे. सध्या चीनमधील नागरिकांनी श्वसनविकार टाळण्यासाठी मुखपट्टीचा वापर करावा. त्याचबरोबर लसीकरणावर तेथील सरकारने भर द्यावा, अशा सूचना देण्यात आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

’रुग्णालयातील मनुष्यबळाची उपलब्धता, रुग्णालयात पुरेशा खाटांची व्यवस्था

’इन्फ्लूएंझासाठी औषधे आणि लशीचा साठा, वैद्यकीय ऑक्सिजन, प्रतिजैविकांसह आवश्यक सामग्रीचा साठा

’ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांची तपासणी, व्हेंटिलेटरची कार्यक्षमता चाचणी, संसर्ग नियंत्रण पद्धतीवर भर