बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के निर्यात कर लादूनही निर्यात सुरू राहिल्यामुळे केंद्र सरकारने बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मोसमी पावसाने ओढ दिल्यामुळे भात लागवड रखडली आहे. देशांतर्गत तांदळाची उपलब्धता कायम राहून, दरवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोसमी पावसाने ओढ दिल्यामुळे देशात सरासरीच्या तुलनेत दहा लाख हेक्टरने पेरण्या कमी झाल्या आहेत. मागील वर्षी १४ जुलैपर्यंत ६०७.९८ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. यंदा १४ जुलैपर्यंत ५९८.४३ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. अपुऱ्या पावसाचा भात लागवडीला मोठा फटका बसला आहे. भात लागवड ६.१ टक्क्यांनी घटून १४ जुलैपर्यंत १२३.१८ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे.

हेही वाचा >>> मद्यधुंद सहायक फौजदाराची वाहन चालकाकडे पैशांची मागणी… या कारवाईने उतरली नशा

देशांतर्गत बाजारात तांदळाची उपलब्धता कायम राहून, दरवाढ नियंत्रणात राहण्यासाठी ८ सप्टेंबर २०२२ रोजी बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के निर्यात कर लादला होता. त्यानंतरही बिगरबासमती तांदळाची निर्यात सुरूच होती. सप्टेंबर २०२१ ते मार्च २२ मध्ये ३३.६६ लाख टन निर्यात झाली होती. निर्यातकर लागू केल्यानंतर त्यात वाढ होऊन सप्टेंबर २०२२ ते मार्च २३ या काळात ४२.१२ लाख टन निर्यात झाली आहे. एप्रिल २०२३ ते जून २०२३ या काळात १५.५४ लाख टन निर्यात झाली आहे. मागील वर्षाच्या याच काळाच्या तुलनेत निर्यातीत ३५ टक्क्यांनी वाढ झाली होती. निर्यात कर लागू केल्यानंतरही निर्यात सुरू राहिल्यामुळे केंद्राने सावधगिरी म्हणून आता पूर्ण निर्यात बंदी लागू केली आहे.

हेही वाचा >>> राज्यात उद्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहणार; पुणे, पालघरला ‘रेड ॲलर्ट’

केंद्र सरकारने यापूर्वी तुकडा तांदळावर निर्यात बंदी घातली आहे. आता बिगरबासमतीवर निर्यात बंदी घातली आहे. या निर्यातबंदीचा बाजारातील दरांवर पारिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे तांदूळ निर्यातदार यांनी राजेश शहा सांगितले.

बिगरबासमती तांदूळ का महत्त्वाचा?

देशात मागील वर्षी १२३० लाख टन एकूण तांदूळ उत्पादन झाले होते. एकूण निर्यातीमध्ये बिगरबासमती तांदळाचा वाटा सरासरी २५ टक्के असतो. सन २०२०-२१मध्ये ३५,५०० कोटी रुपये किमतीचा १३० लाख टन बिगरबासमती तांदूळ निर्यात झाला होता. सन २०२१-२०२२मध्ये ४५ हजार कोटी रुपये किमतीचा १७० लाख टन तांदूळ निर्यात झाला होता. सन २०२२-२४मध्ये ३५ हजार कोटी रुपये किमतीचा १२५ लाख टन तांदूळ निर्यात झाला होता. देशातून इंद्रायणी, आंबेमोहोर, सुरती कोलम आदी वाणांचा तांदूळ जगभरात निर्यात होतो.