पुणे : केंद्र सरकारच्या ‘मिशन मौसम’ प्रकल्पामुळे हवामान अंदाज अधिक अचूक, तातडीने आणि ठिकाणनिहाय वर्तविणे शक्य होणार आहे, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रामचंद्रन यांनी गुरुवारी दिली.

केंद्र सरकारने ‘मिशन मौसम’ प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद असून, हवामान अंदाज वर्तविण्यासाठी लागणारी अत्याधुनिक साधन सामग्री उपलब्ध होणार आहे. हवामान अंदाज अधिक अचूक, तातडीने आणि ठिकाणनिहाय वर्तविणे त्यामुळे शक्य होणार आहे, असे डॉ. रामचंद्रन यांनी सांगितले.

possibility of cloudy weather in maharashtra due to low pressure area formed in bay of bengal
रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण; जाणून घ्या, थंडीची लाट, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
minimum temperatures in north Maharashtra
Maharashtra Weather Update : थंडीत आणखी वाढ होणार ? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासाठीचा अंदाज
Pune Water Supply, Water Resources Department,
पुण्याच्या पाण्याचे नियंत्रण जाणार जलसंपदा विभागाच्या ताब्यात? नक्की काय आहे कारण !
mumbai, Coldest December, minimum temperature
मुंबई : नऊ वर्षांतील थंड डिसेंबर
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य

हे ही वाचा… पुणे शहरात वाहनांची तोडफोड सुरूच; रागातून चाकूने वार आणि फसवणुकीच्या घटनांचीही नोंद

दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. रामचंद्रन म्हणाले, ‘मिशन मौसम प्रकल्पांचे दोन टप्पे आहेत. दोन हजार कोटी रुपयांची तरतूद असलेला पहिला टप्पा सप्टेंबर २०२४ ते मार्च २०२६ या काळात राबविला जाईल. या टप्प्यात निरीक्षण नोंदविण्याची व्यवस्था अधिक सक्षम केली जाईल. सध्या देशात एस बॅण्ड दर्जाचे केवळ २२ रडार आहेत. अन्य प्रगत देशांच्या तुलनेत त्यांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे ४०० किलोमीटर परिसरातील अचूक निरीक्षणे नोंदविणाऱ्या अत्याधुनिक अशा रडारची संख्या वाढविली जाईल.

हे ही वाचा…पुणे: मुंबई- बंगळुरु महामार्गालगत होणार एसआरए प्रकल्प; प्रकल्प रद्द होण्याकरिता ‘त्या’ व्यक्तीने घेतल्या मृत व्यक्तींच्या सह्या?

याद्वारे देशातील कानाकोपऱ्यासह जगातील सर्व समुद्र, महासागर, उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील हालचाली आणि निरीक्षणे अधिक अचूक नोंदविणे आणि कमीत कमी वेळेत ती आपल्याला मिळण्याची व्यवस्था निर्माण केली जाईल. रडार सेवा पुरविणाऱ्या काही जागतिक संस्था, संघटनांशी करार करण्यात येतील. निरीक्षण यंत्रणा अत्याधुनिक करून, तिची व्याप्ती वाढविण्यात येईल. सध्या ढगांची उंची, व्याप्ती आणि ढगातील आर्द्रतेची माहिती मिळते. येत्या काळात ढगांमधील हालचालींचीही माहिती आपल्याला मिळेल. मिळालेल्या माहितीचे वेगाने विश्लेषण करण्यासाठी प्रगत संगणक बसविले जातील. विविध प्रकारच्या प्रारूपांमध्ये समन्वय साधून अचूक अंदाज, समाजमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहचविले जातील.

हे ही वाचा…पिंपरी : बचत गटातील महिलांनी साकारला ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा देखावा

हवेच्या गुणवत्तेसाठी ‘मौसम जीपीटी’

येत्या काळात ‘मौसम जीपीटी’सारखी व्यवस्था सुरू करण्याचा विचार आहे. प्रामुख्याने शहरांमधील हवेच्या गुणवत्तेचा अंदाज अचूक वर्तविला जाईल. सध्या सात दिवसांच्या हवामान अंदाजाची अचूकता ७० टक्के आहे, ती ७५ टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. दीर्घकालीन, अल्पकालीन अंदाजासह सर्वच प्रकारच्या अंदाजांची अचूकता पाच टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम आणि अत्याधुनिक करण्यावर भर असेल, असे डॉ. रविचंद्रन म्हणाले.

Story img Loader