पुणे : केरळमध्ये मागील काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. याच वेळी केरळमध्ये करोना विषाणूच्या जेएन १ या अतिसंसर्गजन्य उपप्रकाराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सावधगिरी आणि दक्षता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव सुशांत पंत यांनी याबाबत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सोमवारी पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे, की केंद्र आणि राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आपण करोना रुग्णसंख्या कमी राखण्यात यश मिळवले आहे. करोना विषाणूचे नवनवीन उपप्रकार येत असल्याने संसर्गात वाढ होत आहे. अशा वेळी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर आव्हानात्मक स्थिती निर्माण होत आहे. त्याचा सामना करण्यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

Maharashtra hospitals loksatta news
दोन कोटींनी वाढली बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Deputy Chief Minister Eknath Shinde on a tour of Dare village
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर
Cold response to hearing on objections to inclusion of 29 villages in Vasai Virar Municipal Corporation
२९ गावांवरील सुनावणीला थंड प्रतिसाद, ३ दिवसांची मुदत वाढवली
another dead body found in skeleton of Gateway of India Neelkamal boat
नीलकमल बोट अपघात : प्रवासी बोटीवरील लहान मुलासह दोघेजण अद्याप बेपत्ता, नौदल, तटरक्षक दलाकडून शोध सुरू
harnai port diesel seized
हर्णै बंदरात दापोली पोलिसांनी नौकेत ३० हजार लिटर अवैध डिझेल साठा पकडला
fake medicines supplied from bhiwandi thane
धक्कादायक! ठाणे जिल्ह्यातून बनावट औषधांची रुग्णांना विक्री, आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Maharashtra Cabinet Expansion: शिवसेना शिंदे गटातून कुणाला मिळाले मंत्रिपद, पाहा यादी

हेही वाचा >>>मालमत्ता कराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय : मालमत्ता कर नावावर करण्यासाठी महापालिकेत जाण्याची गरज नाही!

राज्यांनी काय उपाययोजना कराव्यात?

– आगामी सणासुदीच्या काळात संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न करा.

– करोनाच्या नवीन प्रकारावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करा.

– फ्लूसदृश आजारांची जिल्हानिहाय माहिती दररोज जमा करा.

– सर्व जिल्ह्यांमध्ये करोना चाचणीसाठी पुरेशी व्यवस्था करणे.

– आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविणे.

– करोना चाचणीचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविणे.

– करोना संसर्गाबद्दल जनतेत जागरूकता निर्माण करणे.

करोना विषाणूचा उपप्रकार जेएन १ हा केरळमध्ये आढळून आला आहे. अमेरिकेसह युरोपमध्ये या उपप्रकारांमुळे रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात अद्यापपर्यंत हा उपप्रकार आढळून आलेला नाही.- डॉ. राजेश कार्यकर्ते, राज्य समन्वयक, जनुकीय क्रमनिर्धारण

Story img Loader