पुणे : लहान मुलांना लसीकरणानंतर अनेक वेळा ताप येतो. त्यावेळी डॉक्टरांकडून पॅरासिटामॉल औषध देण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, लहान मुलांना या औषधाची नेमकी किती मात्रा द्यावयाची याबाबत स्पष्टता नव्हती. आता केंद्रीय आरोग्य विभागानेच लहान मुलांना या औषधाची किती मात्रा द्यायची हे जाहीर केले आहे. याचबरोबर या औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश सरकारी रुग्णालयांना देण्यात आले आहेत.

आरोग्य विभागाने सर्व जिल्हा रुग्णालयांना याबाबत सूचना केल्या आहेत. यानुसार, लहान मुलांना लसीकरणानंतर ताप आल्यावर गोळ्यांऐवजी वयानुसार पॅरासिटामॉलच्या द्रवरूप औषधाची मात्रा द्यावी. मुलांचे नियमित लसीकरण करण्यात येणाऱ्या रुग्णालयांत पॅरासिटामॉल औषधांचा पुरेसा साठा ठेवावा. मुलांना वयानुसार औषधाची मात्रा किती देण्यात यावी, याची माहिती लसीकरण अधिकाऱ्यांनी पालकांना देणे आवश्यक आहे.

over12 lakh citizens in maharashtra vaccinated against tuberculosis
राज्यामध्ये १२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे झाले क्षयरोग लसीकरण; मुंबईमध्ये अद्याप लसीकरण मोहीमेला सुरुवात नाही
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
mayonnaise food poisoning banned
‘या’ राज्याने मेयोनीजवर बंदी का घातली? मेयोनीज शरीरासाठी खरंच घातक आहे का?
ayushman bharat yojana
अन्वयार्थ : हा अट्टहास कशासाठी?
Eknath shinde
नियुक्ती प्रक्रियेत अधिकार नसताना मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप, आरोग्य विभागातील ६०० नियुक्त्यांना स्थगिती; मॅटच्या प्राधिकरणाचे ताशेरे
number of teachers declined
शिक्षकांची पदसंख्या घटणार, विशेषज्ञ शिक्षकांची होणार कंत्राटी नियुक्ती
The state government has decided to upgrade 108 ambulances
पाच महिन्यांत १०८ रुग्णवाहिका कात टाकणार, रुग्णांना उपलब्ध होणार अद्ययावत रुग्णवाहिका
u win vaccine
गरोदर महिला आणि मुलांसाठी ‘U-WIN Portal’ची सुरुवात; याचा कसा होणार फायदा?

हेही वाचा…पिंपरी : पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड शहर तुंबणार?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले यांनी याबाबतच्या सूचना रुग्णालयांना केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, बालकांना अजूनही अर्धवट लसीकरण केले जाते. यामागे लसीकरणानंतर येणारा ताप, वेदना आणि सूज यांसारख्या किरकोळ गोष्टींची भीती कारणीभूत असते. त्यामुळे आरोग्य कर्मचारी पॅरासिटामॉलच्या गोळ्या मुलांच्या पालकांना वितरित करतात. या गोळ्यांचे तुकडे करून पाण्यात विरघळवून देण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे लहान मुलांना या औषधाची जास्त अथवा कमी मात्रा मिळण्याचा धोका असतो. त्यामुळे आता द्रवरूप पॅरासिटामॉल औषध लहान मुलांना देण्यात यावे.

लसीकरणानंतर ताप आल्यास पॅरासिटामॉलची किती मात्रा द्यावी, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना नव्हत्या. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. पॅरासिटामॉलचा डोस वयानुसार आणि गरजेनुसार दिल्यास तापाचे प्रभावी व सुरक्षित व्यवस्थापन करण्यास मदत होईल. लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन वैद्यकीय अधिकारी आणि लसीकरण कर्मचाऱ्यांनी करावे. रुग्णालयात पॅरासिटामॉलचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठीही पावले उचलण्यात आली आहेत, असे डॉ. नागनाथ येम्पल्ले यांनी रुग्णालयांना कळविले आहे.

हेही वाचा…पिंपरी : पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच इंद्रायणी नदीच्या पाण्यावर फेस

पॅरासिटामॉलची किती मात्रा द्यावी?

वयोगट – मात्रा
६ आठवडे ते ६ महिने : २.५ मिली
६ आठवडे ते २५ महिने : ५ मिली
२ ते ४ वर्षे : ७.५ मिली
४ ते ६ वर्षे : १० मिली

हेही वाचा…पुणे: रक्ताचा नमुना आईचाच; न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल, अगरवाल दाम्पत्यासह डॉक्टरांच्या पोलीस कोठडीत वाढ

औषध देताना याकडे द्या लक्ष…

बाळाला ताप १००.४ फॅरनहिटच्या वर असल्यास द्यावे.
दोन किलोपेक्षा कमी वजन असणाऱ्या बाळांना देऊ नये.

लसीकरणानंतर ताप आल्यास द्यावे.
२४ तासांमध्ये कमाल ४ वेळा द्यावे.

प्रत्येक मात्रा देण्यात ४ तासांचे अंतर हवे.