पुणे: रेल्वेने आता निविदा प्रक्रियेत अमूलाग्र बदल केले आहेत. पारंपरिक निविदा प्रक्रियेकडून ई-निविदा आणि आता थेट ई-लिलाव असा टप्पा रेल्वेने गाठला आहे. मध्य रेल्वेने एकाच दिवसांत पाच स्थानकांतील वाहनतळांचा लिलाव केला आहे. ही प्रक्रिया केवळ ३० मिनिटे ते एक तासाच्या कालावधीत पार पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रेल्वेने निविदांच्या खुल्या बोलीसाठी ऑनलाइन ई-लिलाव सुरू केले आहेत. यात विविध सहभागी कंत्राटदारांसाठी ऑनलाइन बोली लावण्यासाठी ३० मिनिटे ते एक तासाचा कालावधी आहे. यात सर्वाधिक बोली लावणाऱ्याला त्वरित ऑनलाइन निविदा वाटप केले जाते. सर्वाधिक बोली लावणाऱ्याला त्याच दिवशी वाटपाचे पत्रही दिले जाते. या ई-लिलावाने आता पूर्वीच्या पारंपारिक निविदा तसेच ई-निविदा प्रणालीची जागा घेतली आहे. आधी निविदा अंतिम करण्यासाठी सुमारे ३० ते ४५ दिवसांचा कालावधी लागत असते. आता ई-लिलावात निविदा केवळ त्याच दिवशी अंतिम केल्या जातात. त्यामुळे कंत्राटदारांचा तसेच रेल्वेचाही वेळ वाचतो. यामुळे रेल्वेचे उत्पन्न वाढण्यासही मदत झाली आहे.

हेही वाचा… इमारतीच्या खड्ड्यात पडलेल्या सफाई कामगाराला अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवदान

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने २१ जूनला पाच रेल्वे स्थानकांतील वाहनतळांचा ई-लिलाव केला. त्याच दिवशी ऑनलाइन निविदा अंतिम करण्यात आल्या. यातून पुणे विभागाला वार्षिक ४२ लाख ९० हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. तसेच, यातून येत्या तीन वर्षात १ कोटी २८ लाख रुपयांचा महसूल मिळेल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

ई-लिलाव झालेले वाहनतळ (आकडे रुपयांमध्ये)

१) चिंचवड स्थानक: वार्षिक १४ लाख ५१ हजार

२) शिवाजीनगर स्थानक: वार्षिक ११ लाख ११ हजार

३) कोल्हापूर वाहनतळ: वार्षिक १० लाख ६६ हजार

४) सांगली स्थानक: वार्षिक २ लाख ११ हजार

५) केडगाव स्थानक: वार्षिक ४ लाख ५१ हजार