Central Railway emergency Service पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची तब्येत बिघडल्यानंतर आता त्याला तातडीने वैद्यकीय उपचार मिळत आहेत. मध्य रेल्वेने डॉक्टर ऑन कॉल सेवा २४ तास सुरू केली आहे. याचा फायदा गेल्या दोन महिन्यांत मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील २९७ प्रवाशांना झाला आहे. यामुळे वेळीच उपचार मिळाल्याने अनेक प्रवाशांचा जीव वाचला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेने आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रवाशांना देण्यासाठी पावले उचलली आहेत. याअंतर्गत डॉक्टर ऑन कॉल सेवा सुरू करण्यात आली. ही सेवा प्रवाशांसाठी २४ तास उपलब्ध आहे. डॉक्टरांचे एक पथक वैद्यकीय उपचाराची गरज असलेल्या प्रवाशांच्या कॉलवर तातडीने दाखल होते. प्रवासादरम्यान वैद्यकीय मदतीची गरज असलेले प्रवासी रेल मदद उपयोजनाच्या माध्यमातून पुढील स्थानकावर अथवा तिकीट तपासनीसाशी संपर्क साधून वैद्यकीय सेवा मिळवू शकतात.

हेही वाचा >>>पिंपरी : होय, यंदा शहरात सर्वाधिक खड्डे; आयुक्तांची कबुली

मध्य रेल्वेच्या डॉक्टर ऑन कॉल पथकाने १ जून ते ३१ जुलै या कालावधीत एकूण २ हजार १९ प्रवाशांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. यामध्ये नागपूर विभागातील ८१५, भुसावळ विभागातील ५८७, पुणे विभागातील २९७, सोलापूर विभागातील २३६ आणि मुंबई विभागातील ८४ प्रवाशांचा समावेश आहे.

अशी मिळते सेवा…

वैद्यकीय उपचाराची मदत असलेल्या प्रवासी अथवा इतर प्रवाशांकडून रेल मदद उपयोजनाच्या माध्यमातून वैद्यकीय सेवेची मागणी केली जाते. रेल मददकडून पुढील स्थानकाच्या व्यवस्थापकाला संदेश पाठवला जातो. तिथे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय पथक उपस्थित राहते. रेल्वे गाडी पुढील स्थानकावर पोहोचल्यानंतर तातडीने वैद्यकीय पथक गाडीत जाऊन प्रवाशावर उपचार करते. आवश्यकता असल्यास या प्रवाशाला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात येते.

हेही वाचा >>>Pune Crime News: पुण्यात रस्त्यावर होणाऱ्या वादातून मारहाणीचे प्रकार वाढीस; अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकीस्वाराला गजाने मारहाण

गर्भवतीसह बाळाला जीवदान

कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसने ६ जूनला प्रवास करणाऱ्या गर्भवतीला लोणावळ्यातून गाडी सुटल्यानंतर प्रसव वेदना सुरू झाल्या. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलत कर्जत स्थानकावर वैद्यकीय पथकाला पाचारण केले. ही गाडी तिथे पोहोचल्यानंतर या महिलेला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिची सुरक्षित प्रसूती होऊन तिने एका निरोगी बाळाला जन्म दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway is available to provide emergency medical services to passengers pune print news stj 05 amy