पुणे : पुणे-बिकानेर एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी उद्घाटनाचा हिरवा झेंडा दाखवला. ही साप्ताहिक गाडी सुरू झाली असून, त्यामुळे पुण्याशी सुरत, बडोदा, अहमदाबाद आणि जोधपूर ही शहरे थेट जोडली गेली आहेत.पुणे रेल्वे स्थानकावर या कार्यक्रमास राजस्थानमधील पालीचे खासदार पी.पी.चौधरी आणि सुमेरपूरचे आमदार जोराराम कुमावत यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी स्वागत केले तर विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे यांनी आभार मानले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेने पुणे-बिकानेर ही नवीन विशेष गाडी सुरू केली आहे. पुण्यातून पहिली गाडी मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी रवाना झाली. ती बिकानेरला बुधवारी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. पुणे-बिकानेर ही विशेष गाडी साप्ताहिक असेल. ही गाडी दर मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातून रवाना होईल. ती बिकानेरला दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी बिकानेरमधून दर सोमवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पुण्यात पोहोचेल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway minister gives green flag to pune to bikaner express pune print news stj 05 amy