पुणे : पावसाळ्यात लोणावळा ते कर्जतदरम्यान लोहमार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत होते. यामुळे लोणावळा ते कर्जत दरम्यानच्या घाटमाथ्याची पाहणी मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यादव यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोणावळा ते कर्जत लोहमार्गावर ५२ बोगदे असून, डोंगरांची उंची अडीचशे मीटरपर्यंत आहे. या मार्गावर अतिशय तीव्र वळणे आणि चढ आहेत. यामुळे कठीण असा हा लोहमार्ग आहे. लोणावळा ते कर्जत घाटमाथ्याची पाहणी सरव्यवस्थापक यादव यांनी केली. याचबरोबर मंकी हिल घाटाची पाहणीही त्यांनी केली. वारंवार दरडी कोसळण्याच्या ठिकाणे तपासून त्यांनी त्याठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

हेही वाचा : दुबईतील पावसाचा पुणेकर हवाई प्रवाशांना बसतोय फटका

डोंगरातील पाण्याच्या प्रवाहांची पाहणीही यादव यांनी केली. डोंगररांगांतून खाली येणारे पावसाचे पाणी योग्य पद्धतीने वाहून जावे, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. काही ठिकाणी नवीन नाल्यांची बांधणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी मुंबईचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway ram karan yadav inspected lonavala to karjat train route ahead of monsoon season pune print news stj 05 css
Show comments