पुणे : मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षात जानेवारीपर्यंत ७ हजार ६६५.५३ कोटी रुपयांचा महसूल मालवाहतुकीतून नोंदवला आहे. सर्वाधिक महसूल खनिज कोळशाच्या वाहतुकीतून मिळाला आहे. याचवेळी लोह खनिजाच्या वाहतुकीद्वारेही विक्रमी उत्पन्न मिळवण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर जानेवारी पर्यंतच्या मध्य रेल्वे सर्व विभागामध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे. मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये जानेवारीपर्यंत ७ हजार ६६५.५३ कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वाधिक मालवाहतूक महसूल नोंदविला गेला आहे. मागील आर्थिक वर्षीच्या याच कालावधीतील ६ हजार ७९७.२३ कोटी रूपयांच्या महसुलाच्या तुलनेत आता प्रमाण १२.७७ टक्के अधिक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पिंपरी- चिंचवडमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या, २७ पैकी १९ अधिकारी नागपूरचे

हेही वाचा : पुणे महापालिकेकडून कोट्यवधी ‘निविदांचा पाऊस’… निधी खर्च करण्यासाठी पळापळ

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये लोहखनिजाच्या वाहतुकीतून ४३८.१९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या आर्थिक वर्षीच्या तुलनेत तो ६४.२५ टक्के अधिक आहे. हे यश नागपूर विभागाने लोहखनिजाची वाहतूक वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे मिळाले आहे. कोळसा वाहतुकीतून रेल्वेला ३ हजार ४२१.२२ कोटींचा महसूल मिळाला असून तो गेल्या आर्थिक वर्षीच्या तुलनेत १०.९४ टक्के जास्त आहे. मुंबई आणि नागपूर विभागाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही वाढ झाली आहे. सोलापूर आणि नागपूर विभागाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सिमेंट वाहतुकीतून ६१६.०८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागील आर्थिक वर्षीच्या तुलनेत तो ४३.५४ टक्के जास्त आहे. लोह आणि पोलाद वाहतुकीतून ५५५.८५ कोटींचा महसूल मिळाला असून तो गेल्या आर्थिक वर्षीच्या तुलनेत २३.१५ टक्के जास्त आहे. मुंबई विभागातून लोह आणि पोलादाच्या सततच्या वाहतुकीमुळे हे प्रमाण वाढले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway received revenue of rupees 3421 crores from coal transportation pune print news stj 05 css