पुणे : उन्हाळी हंगामात रेल्वे गाड्यांना प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रवाशांना स्वस्तात जेवण देण्यासाठी रेल्वेने पावले उचलली आहे. मध्य रेल्वेने १०० स्थानकांवर प्रवाशांना स्वस्तात जेवण देण्याची सुविधा सुरू केली आहे. पुणे विभागात पुणे, मिरज, दौंड आणि साईनगर शिर्डी या स्थानकांवर प्रवाशांना ही सुविधा मिळू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये रेल्वे गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी असते. रेल्वेने अनारक्षित डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर आणि परवडणारे भोजन पर्याय उपलब्ध नसतात. यामुळे मध्य रेल्वेने भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) सहकार्याने प्रवाशांना ही सुविधा सुरू केली आहे. प्रामुख्याने अनारक्षित डब्यांमध्ये स्वस्त दरात जेवण आणि नाश्ता उपलब्ध करून दिला जात आहे.

हेही वाचा >>> पिंपरी : चाकणमध्ये मक्याच्या शेतात गांजा

प्रवाशांना परवडणारे जेवण  २० रुपयांत दिले जात आहे. याचवेळी इतर खाद्यपदार्थ ५० रुपयांत दिले जातील. हे जेवण आणि प्रवाशांना पिण्यासाठी पाणी फलाटावरील अनारक्षित डब्यांच्या जवळ असलेल्या काउंटरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या काउंटरवरून प्रवासी त्यांचे जेवण थेट खरेदी करू शकतात. त्यामुळे विक्रेत्यांना शोधण्याची किंवा स्थानकाच्या बाहेर जाण्याची प्रवाशांना गरज नाही.

मध्य रेल्वेमध्ये पुणे विभागात पुणे, मिरज, दौंड आणि साईनगर शिर्डी स्थानकांवर ही सुविधा सुरू झाली आहे. याचबरोबर मुंबई विभागात इगतपुरी, कर्जत स्थानके, भुसावळ विभागात मनमाड, खंडवा, बडनेरा, शेगाव स्थानके, नागपूर विभागात नागपूर, वर्धा स्थानके, सोलापूर विभागात सोलापूर, वाडी, कुर्डुवाडी स्थानकांवर ही सुविधा सुरू झाली आहे.

हेही वाचा >>> मुळशीतील मुठा गावात थरार ; गुंड नवनाथ वाडकरकडून पोलिसांवर गोळीबार

आणखी स्थानकांमध्ये सुविधा सुरू करणार  

गेल्या वर्षी सुमारे ५१ स्थानकांवर या सेवेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. चाचणीतील यशाच्या आधारावर रेल्वेने या सेवेचा विस्तार केला आहे, आता १०० हून अधिक स्थानकांवर एकूण १५० काउंटरवर कार्यरत आहेत. भविष्यात आणखी स्थानकांचा समावेश करून या उपक्रमाचा आणखी विस्तार करण्याची मध्य रेल्वेची योजना आहे.

असे आहेत दर…

परवडणारे जेवण : २० रुपये इतर खाद्यपदार्थ : ५० रुपये