पुणे : मध्य रेल्वे ६ डिसेंबर रोजी मुंबईतील आगामी महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन, निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालणार आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रित करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरील निर्बंध २ डिसेंबर ते ९ डिसेंबरपर्यंत आहेत.

हेही वाचा…पिंपरी : आचारसंहिता संपताच पीएमआरडीए ॲक्शन मोडवर; अनधिकृत बांधकाम धारकांवर थेट..

खालील स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री प्रतिबंधित असेल :

मुंबई विभाग : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण</p>

भुसावळ विभाग : बडनेरा, अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक
नागपूर विभाग : नागपूर आणि वर्धा

पुणे विभाग : पुणे

सोलापूर विभाग : सोलापूर

सवलत : प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.

दरम्यान सुरळीत आणि सुरक्षित प्रवास अनुभवण्यासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway will temporarily stop sale of platform tickets at major stations on december 6 pune print news stj 05 sud 02