लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शिवाजीनगर येथील सीईओपी मतदान केंद्र युनिक मतदान केंद्र ठरले आहे. मतदान केंदात प्रवेश करताच पांढऱ्या शुभ्र पडद्यांवर इतिहासाची साक्ष देणारे पोस्टर लक्ष वेधून घेतात. ही पोस्टर सीईओपीचा इतिहास, माहिती देतात. पुण्याचा सांस्कृतिक इतिहासालाही उजाळा देतात. त्यामुळे हे मतदान केंद्र मतदारराजाचे लक्ष वेधून घेत आहे.

Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत
Rajan Vikhare, demands CCTV system
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवा, ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांची मागणी
thackeray shiv sena break in panvel
पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…
maharashtra assembly election 2024, Mahayuti Campaign, Palghar, Dahanu,
महायुतीच्या प्रचारात गुजरातमधील निरीक्षकांची देखरेख

शहरी मतदारांचा मतदानाला मिळणारा कमी प्रतिसाद निवडणूक आयोगासह प्रशासनासमोरील प्रश्न बनला आहे. मतदान केंद्रांवर प्रौढ, ज्येष्ठ मतदार दिसून येतात पण, तरुणाई दिसून येत नाही. त्यामुळे तरुण मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती व्हावी, आवड निर्माण व्हावी म्हणून पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीईओपी) युवा संसद क्लबच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम निवडणूक आयोगाच्या संयुक्त विद्यमाने सुरू केल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष स्वप्नील क्षीरसागर यांनी दिली.

आणखी वाचा-भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या शिवाजीनगरमधील मतदारांमध्ये निरुत्साह? आतापर्यंत अवघे २३.२६ टक्के मतदान

आलेल्या मतदारांना तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, यासाठी सीईओपीच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी तयार केलेले भिंत चढणारा रोबोट, विद्यापीठातील निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी ईव्हीएम मशीन, ऑल टेरेन व्हेइकल देखील ठेवली आहे.