सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ड्रोनविषयक प्रमाणपत्र, पदविका, पदवी अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. हे अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना नागरी उड्डाण महासंचालनालयाचा (डीजीसीए) परवानाही मिळणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ड्रोन तंत्रज्ञानातील ड्रोनआचार्य या कंपनीसोबत सामंजस्य करार केला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, ड्रोन आचार्यचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक प्रतीक श्रीवास्तव, प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.आदित्य अभ्यंकर, इनोव्हेशन सेलचे प्रमुख डॉ. संजय ढोले आदी या वेळी उपस्थित होते. विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी फोरफोर्सेस एअरो प्रॉडक्ट या कंपनीसह सामंजस्य करार करून ड्रोनसंबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुण्यातील दोन बँकांवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

आता त्या पुढे जाऊन पदविका, पदवी अभ्यासक्रमही सुरू केले जातील. विविध क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढत असल्याने या क्षेत्रातील नवनव्या संधी निर्माण होत असल्याचे सांगून डॉ. अभ्यंकर म्हणाले, की ड्रोन तंत्रज्ञानातील केवळ ड्रोन पायलट प्रशिक्षणच नाही, तर ड्रोन बिल्डिंग, ड्रोन रेपेरींग अँड मेंटेनन्स, ड्रोन डेटा प्रोसेसिंग, ड्रोन्स फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, कृषी नियोजन करण्यासाठी ड्रोनचा वापर आणि कोडिंग आदी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातील. ड्रोनच्या अभ्यासक्रमांना मागणी वाढत आहे. आतापर्यंत लघुमुदतीचे अभ्यासक्रम राबवले जात होते. विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानुसार नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात लवचिकता राहणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना डीजीसीएचा परवाना मिळणार आहे.