पुणे :  व्‍यावसायिक अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेची (सीईटी) नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विविध प्रवेश परीक्षांच्या नोंदणीसाठीची अंतिम मुदत ३० जानेवारी आहे. राज्य सामायिक प्रवेश कक्षातर्फे (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध पदवी-पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांसाठीचे वेळापत्रक सीईटी सेलकडून या पूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर आता परीक्षांसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> हवाई प्रवाशांचे विमान धुक्यामुळे जमिनीवरच! जाणून घ्या पुण्यातून किती अन् कोणती विमाने रद्द…

सीईटीसाठी नोंदणी केल्यावर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. बीएड-एमएड हा तीन वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम एमएड, एमपीएड, बीपीएड, बीए आणि बीएसस्सी बीएड, एमबीए, आर्किटेक्‍चर, एमसीए, हाॅटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठीची नोंदणी १० जानेवारीपासून सुरु झाली आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या एमएचटी-सीईटीसाठीची नोंदणी मंगळवारपासून (१६ जानेवारी) एमएचटी-सीईटी १६ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. बारावीनंतरच्‍या पाच वर्षीय विधी अभ्यासक्रम प्रवेशाच्‍या सीईटीसाठी नोंदणी १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

Story img Loader