लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पिंपरी-चिंचवडच्या वतीने गेल्या २५ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण स्थगित करण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे उपोषण सुरू होते.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार महिन्यांपासून पासून महाराष्ट्रात विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहेत. शासनाने २४ डिसेंबर २०२३ पर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण करतो असे आश्वासन दिले होते. परंतु, आश्वासन महाराष्ट्र शासन पूर्ण करू शकले नाही. आश्वासन पूर्ण करावे यासाठी महाराष्ट्रभर मराठा समाज विविध ठिकाणी साखळी उपोषण करत होता. याचाच भाग म्हणून पिंपरीत मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाचे गेल्या २५ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू होते. आता हे उपोषण स्थगित करण्यात आले. वैभव जाधव,मीरा कदम, संतोष शिंदे, रावसाहेब गंगाधरे, लहू लांडगे, दिलीप गावडे, वसंतराव पाटील यांनी उपोषण मागे घेतले‌. प्रकाश जाधव, मारुती भापकर उपस्थित होते.

आणखी वाचा-कोरेगाव भीमा विजयस्तंभ परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष कक्ष… जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा ‘वॉच’

२० जानेवारी पर्यंत शासनाने मराठा समाजास सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले नाही. तर, मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे. मुंबई येथील आंदोलनास पिंपरी-चिंचवड शहरातून लाखो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आंदोलनाच्या तयारीसाठी शहरात विविध ठिकाणी बैठका घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी साखळी उपोषण स्थगित केल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कळविण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chain hunger strike of maratha community suspended after 25 days pune print news ggy 03 mrj
Show comments