पुणे : गेल्या काही महिन्यांपासून शहरात महिलांचे दागिने हिसकाविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दागिने हिसकाविणाऱ्या चोरट्यांची धाडस वाढले असून, सोसायटीच्या आवारात शिरुन दागिने चोरून नेल्याची घटना कर्वेनगर भागात घडली. बाणेर भागात एका ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकाविल्यानंतर दागिन्याच्या तुटलेला अर्धा भाग हिसकाविण्यासाठी चोरटे पुन्हा तेथे आल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले आहे.

बाणेर भागातील शिवनेरी सोसायटीच्या परिसरात मंगळवारी रात्री ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ४३ हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुसऱ्या एका घटनेत कोथरुड भागातील डीपी रस्त्यावर असलेल्या एका सोसायटीत मंगळवारी सायंकाळी एका महिलेच्या गळ्यातील दागिने चोरुन नेल्याची घटना घडली.

100-year-old Nagpur railway station witnesses many transformations
१०० वर्ष जुने नागपूरचे रेल्वेस्थानक अनेक स्थित्यंतरांचे साक्षीदार!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mumbai woman entered house in Malad and tried to rob 91 year old woman
डोळ्यात मिरचीपूड टाकून महिलेच्या लुटण्याचा प्रयत्न
Ex-IAS officer assaulted by bus conducter for not paying ₹10 extra for missing stop FIR lodged
‘फक्त १० रूपयांसाठी सोडली माणुसकी!’ कंडक्टरची वृद्धाला मारहाण, तो होता माजी IAS अधिकारी…Viral Videoमध्ये पाहा काय घडले?
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
14 year old girl pregnant loksatta news
Nagpur Crime News: १४ वर्षांची मुलगी तीन महिन्यांची गर्भवती, प्रियकराविरुद्ध गुन्हा
fraud with senior citizen women near Shaniwarwada mangalsutra stolen
शनिवारवाड्याज‌वळ ज्येष्ठ महिलेची फसवणूक, बतावणी करुन मंगळसूत्र चोरी
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?

तक्रारदार महिला आणि त्यांचे पती सायंकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते. सोसायटीच्या आवारातून महिला आणि पती घरी निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेले दोन चोरटे सोसायटीच्या आवारात शिरले. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी तिच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला. पसार झालेल्या चोरट्यांना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले आहे. चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.

कर्वेनगर भागातील नवसह्याद्री सोसायटीत चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. . मात्र, मंगळसूत्राचा अर्धा भाग हातात आल्याचे लक्षात आल्यानंतर चोरटे पुन्हा महिलेजवळ आले. महिलेचे अर्धवट तुटलेले मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले. चोरट्यांनी धक्का दिल्याने महिला रस्त्यात पडली. मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्यांची छबी सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आली आहे.

दागिने हिसकाविणाऱ्या चोरट्यांची हिमत वाढली दागिने हिसकाविणाऱ्या चोरट्यांची हिंमत वाढली आहे. सोसायटीच्या आवारात शिरुन चोरट्यांनी महिलेचे दागिने चोरुन नेले. दागिने चोरट्यांना पकडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Story img Loader