मोटारीतून आलेल्या चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना खराडी भागात घडली.

याबाबत एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सकाळी सातच्या सुमारास खराडी बाह्यवळण मार्गाने जात होती. त्या वेळी मोटारीतून आलेल्या चोरट्यांनी महिलेकडे पत्ता विचारण्याचा बहाणा केला. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख २० हजारांचे मंगळसूत्र लांबविले.

महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगाने पसार झाले. सहायक निरीक्षक मनोहर सोनवणे तपास करत आहेत.

Story img Loader